top of page
Search
  • Writer's pictureDr. Shrikant N. Devdikar

मधुमेह व किडनी - Diabetic Kidney Disease

“किडनी चे आजार वाढत आहेत !” असे आजकाल माझ्या कानावर खूप येतं. मग आधी नव्हते का आजार होत किडनीला?


ह्वायचे पण निदान होण्याआधीच किंवा उपचार मिळण्या आधीच पेशंट दगावैचे. दुसरी गोष्ट म्हणजे, भारताची लोकसंख्या ही तेवढीच वाढत आहे, शहरीकरन, लाइफस्टाईल - यामुळे मधुमेहाच्या रोग्यांची संख्या ही वाढते आहे.


किडनी “फेल” होण्या मागे मधुमेह हे एक नंबरचे कारण आहे.


१०० रोग्यांमध्ये ३५ ते ४० डायलिसीस करणाऱ्या रोग्यांची किडणी खराब होण्याचे कारण मधुमेह असतो.

हे सुरू कसे होते?

किडणीला झालेल्या नुकसाना मुळे सुरुवातीला लघवीतून प्रथिने जाऊ लागतात.

ही भविष्यात होणाऱ्या किडणीच्या गंभीर रोगाची पहिली खुण असते. ह्यानंतर शरीरातून पाणी आणि क्षार बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरावर सूज येऊ लागते आणि वजन वाढू लागते, तसेच रक्तदाबही वाढतो. उच्च रक्तदाब हा अशा खराब होणाऱ्या किडणीवर आणखी भार टाकून किडणी अधिक कमजोर करतो.

साधारणपणे

मधुमेह झाल्यानंतर ७ ते १० वर्षांनी किडणीचे नुकसान व्हायला सुरुवात होते.

मात्र त्वरित योग्य उपचार आणि पथ्य पाळले तर डायलिसीस आणि किडणी प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार दीर्घकाळापर्यंत टाळता येतात.

त्याचे लक्षणे काय आसतात ?

प्राथमिक अवस्थेत किडणीच्या रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. डॉक्टरांनी केलेल्या लघवीच्या तपासणीत अल्बुमिन (प्रथिने) जाणे हे किडणी रोगाचे प्राथमिक लक्षण असते.



मधुमेहाचा किडणीवर होणारा परिणाम कसा थांबविता येतो ?

डॉक्टरांकडून नियमित तपासणी करणे. मधुमेह आणि उच्चरक्तदाबावर नियंत्रण.

त्वरित निदानासाठी योग्य तपासणी करणे. वेदना शामक औषधे डॉक्टरांच्या सलल्याशिवाय घेऊ नये.

“किडनी चे काम हे सरासरी १० % वर आल्यावर आपल्याला डायालिसीस सुरू करावे लागते.”

डायालिसीस म्हणजे काय ?


डायालिसीस म्हणजे किडनी चे काम मशीन द्वारे व रख्त शरीराबाहेर शुद्ध करणे.


डायालिसीस म्हणजे जीवनाचा अंत नव्हे. डायालिसीस च्या आता चांगल्या सुविधा आहेत व भरपूर लोकं रोज डायालिसीस करून आपले-आपले काम ही करत आहेत. काही लोकं शिक्षक आहेत, काही पोलिसात आहेत व काही डायालिसीस चालू आसताना बिजनेस ही छान बघतात. पण हे सर्व नीट होण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्यावर लवकर डायालिसीस ल सुरुवात करणे, ए वी फिसतुला हातावर बनवून घेणे, योग्य ती इंजेक्शन वेळेवर घेणे, पात्तळ पदार्थ (पानी) यावर नियंत्रण ठेवणे जरूरी आहे.



 

The Author: Dr. S N Devdikar, is a Nephrologist, having expertise of over 20,000 dialysis since 2014 at Devdikar Medical Centre which is an ISO 9001:2015 Certified Centre, 35 bedded hospital facility inclusive of Dialysis (12 bedded), Intensive Care Unit (10 bedded), equipped with Operation theatre & Ultrasonography center in service since 1982, attached with fully operational Laboratory services & Medical store with Nephrology, Urology, Obstetric-Gynecology, Critical Care & General Medicine specialties along with MJPJAY National Insurance.


For more information on the Author visit

62 views0 comments

Comments


bottom of page